ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा नवा पक्ष कोणता? EC कडून आज दुपारी 3 वाजेपर्यंत 3 पर्याय सूचवण्याचे निर्देश

मुंबई

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिल्याचा निकाल जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आयोगाने शरद पवारांना त्यांच्या गटासाठी नवं नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यासाठी ३ पर्याय सुचवण्याचे निर्देश दिले आहेत. आज बुधवारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवारांचा नवा पक्ष आणि नवं चिन्ह कोणतं निवडतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शरद पवार गटाला स्वतःच्या पक्षाचे नवे नाव व चिन्ह घ्यावे लागणार आहे. त्यासाठी आयोगाने त्यांना बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटाने पक्षासाठी ‘मी राष्ट्रवादी पार्टी’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ व ‘स्वाभिमानी राष्ट्रवादी पार्टी’ ही 3 नावे, तर निवडणूक चिन्ह म्हणून ‘उगवता सूर्य’, ‘कपबशी’, ‘सूर्यफूल’, हे 3 पर्याय सूचवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

यापूर्वी शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं नाव आणि पक्षाचं चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना कामाला लागा, असा सल्ला दिला होता. एकदा निकाल लागला की चर्चा करता येत नाही. अशावेळी निकाल स्वीकारावा लागतो. नवं चिन्ह घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवायची, असंही ते म्हणाले होते. शरद पवार यांनी स्वत: दोन बैल, चरखा, पंजा, घड्याळ अशा वेगवेगळ्या ५ चिन्हांवर निवडणूक लढून जिंकल्याची माहिती दिली होती.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात