रायगड
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नवं पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आज शरद पवार रायगडावर शक्तिप्रदर्श केलं. यावेळी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात म्हणूनही या कार्यक्रमाकडे पाहिलं जात आहे. रायगडावर होणाऱ्या या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित आहेत.
रायगड किल्ला चढण्यासाठी अवघड आहे. यामुळे शरद पवार रोप वे च्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पोहचले आहेत. त्यानंतर पालखीच्या माध्यमातून त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. रोपे वे ते कार्यक्रम स्थळ जाण्यासाठी बराच अंतर चालत जावे लागते. शरद पवार यांनी इतके चालणे शक्य नाही. त्यामुळे पालखीच्या साह्याने त्यांना कार्यक्रमस्थळी नेले गेले आहे. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेचा ताफाही सोबत होता.