X : @therajkaran
मुंबई: प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi – MVA) लेखी पत्र देऊन महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ पैकी २६ जागांवर आघाडी करण्यासाठी चर्चा होऊ शकेल, असे स्पष्ट केले. वंचितने या २६ मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी तयारी केली आहे, पण आता महाविकास आघाडी आमच्यासोबत जागा वाटपाची चर्चा करण्यास तयार आहे, तर ही आमची यादी तुम्हाला देतो, असे सांगत वंचित बहुजन आघाडी एकतर स्वतंत्र चूल मांडेल कीव २०१९ च्या लोक सभा निवडणुकीप्रमाणे भारतीय जनता पक्षासोबत जाईल, हे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले आहे.
वंचितचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धण पुंडकर यांच्या स्वाक्षरीने महाविकास आघाडीला (MVA) सादर केलेल्या पत्रात वंचितने (VBA) स्पष्ट केले आहे की वंचितने लोकसभेच्या (Lok Sabha elections) २६ जागा पूर्ण ताकदिनीशी लढण्याची तयारी केली आहे. वंचित स्वतंत्रपणे लढली तर या २६ जागा लढेल. मात्र, आता महाविकास आघाडीने जागा वाटपासंदर्भात आमच्यासोबत चर्चा सुरू केली आहे, तर आम्ही लढण्याची तयारी केली असलेल्या मतदारसंघाची यादी सोबत जोडली आहे. राज्यातील काही जागा वगळता या २६ जागेसंदर्भात वाटाघाटी होऊ शकतील, असे डॉ पुंडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
विभाजनवादी भाजप – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (BJP – RSS) पराभव झाला पाहिजे आणि सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येवून भाजप विरोधात एकजुटीने लढले पाहिजे, हाच वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा असल्याचे सांगायला वंचित विसरले नाही.
वंचितला हव्या या जागा
१. अकोला, २. अमरावती, ३. नागपूर, ४. भंडारा – गोंदिया, ५. चंद्रपूर, ६. हिंगोली, ७. उस्मानाबाद (धाराशिव), ८. औरंगाबाद (छत्रपती सांभाजीनगर), ९. बीड, १०. सोलापूर, ११. सांगली, १२. माढा, १३ रावेर, १४. दिंडोरी, १५. शिर्डी, १६. मुंबई दक्षिण – मुंबई, १७. मुंबई उत्तर – मध्य, १८. मुंबई उत्तर – पूर्व, १९. रामटेक, २०. सातारा, २१. नाशिक, २२. मावळ, २३. धुळे, २४. नांदेड, २५. बुलढाणा, २६. वर्धा