ताज्या बातम्या महाराष्ट्र

Madha Lok Sabha : माढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा

X: @therajkaran

मुंबई: माढा लोकसभा मतदारसंघ अधिकच चर्चेत आला आहे. या मतदारसंघात आधी महायुती आणि आता महाविकास आघाडीत जागेवरून रस्सीखेच चालु आहे. या मतदारसंघावर (Madha LokSabha) आता शेकापने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) पेच वाढण्याची शक्यता आहे. आमदार जयंत पाटील (Jayant Patil), शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr Babasaheb Deshmukh) यांच्यासह कार्यकत्यांनी सोमवारी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात आमदार पाटील यानी इंडिया आघाडीमधून माढा (Madha) आणि हातकणंगले (Hatkanangle) हे दोन मतदारसंघ शेकापला (PWP) मिळावे यासाठी आग्रही मागणी केली. या मागणीमुळे महाविकास आघाडीमध्ये (MVA) पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे

विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांनी (Sharad Pawar) रासपचे (RSP) प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना सोडण्याची तयारी दाखवली असतानाच, जयंत पाटलांच्या दाव्याने नवीन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन धनगर समाज (Dhangar Community) आपलासा करायचा असा प्लॅन शरद पवारांचा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महादेव जानकर यांना माढा सोडण्याची ऑफर दिली होती. याचा फायदा सुप्रिया सुळे यांच्या बारामतीसह इतर मतदारसंघात होऊ शकणार होता. मात्र आता भाई जयंत पाटील यांनी माढा मतदारसंघावर दावा केल्याने आघाडीसमोरील अडचणी वाढणार आहेत. 

दरम्यान सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे माढासह हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापाला मिळावेत, असा डाव जयंत पाटील यांच्याकडून टाकला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, रासपचे महादेव जानकर यांच्यानंतर आता नव्या पक्षाने दावा सांगितल्याने माढयाचा तिढा आणखी वाढणार आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात