नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून रोख्यांचा तपशील गुरुवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यामध्ये २० कंपन्यांनी तब्बल ५ हजार ४२० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक कंपन्या या बांधकाम, खाणकाम, फायनान्स क्षेत्राशी संबंधित आहे.
मात्र कोणत्या कंपनीने किंवा व्यक्तीने कोणत्या पक्षाला रोखे दिले ही बाब मात्र कळू शकलेली नाही.
कोणत्या कंपन्यांनी किती रोखे केले खरेदी?
फ्युचर गेमिंग – १,३६८ कोटी
मेघा इंजिनिअरिंग – ९६६ कोटी
क्विक सप्लाय चेन – ४१० कोटी
वेदांत लि. – ४०० कोटी
हल्दिया एनर्जी – ३७७ कोटी
भारती समूह – २४७ कोटी
एस्सेल मायनिंग – २२४ कोटी
वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन – २२० कोटी
केवेंटर फूडपार्क इन्फ्रा – १९४ कोटी
मदनलाल लि. – १८५ कोटी
कोणत्या पक्षाला किती रोख?
भाजप : 8633 कोटी
तृणमूल काँग्रेस : 3305
काँग्रेस : 3146
भारत राष्ट्र समिती : 1806
बीजू जनता दल : 830
द्रमुक : 648
वायएसआर काँग्रेस : 472
शिवसेना : 354
आप : 245
राष्ट्रीय जनता दल : 149
राष्ट्रवादी काँग्रेस : 116
जेडीएस : 75
समाजवादी पक्ष : 43
झारखंड मुक्ती मोर्चा : 45
जनसेवा पक्ष : 39
अण्णा द्रमुक : 38
नॅशनल कॉन्फरन्स : 4
तेलुगू देसम पक्ष : 3
सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली इलेक्टोरल बॉन्डची स्कीम रद्द केली होती. त्यानंतर एसबीआयला निवडणूक आयोगाला हा डेटा 6 मार्चपर्यंत सर्व डेटा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाला ही सर्व माहिती 13 मार्चपर्यंत प्रसिद्ध करण्याचा आदेश देखील दिला होता.
मात्र 4 मार्चला एसबीआयने न्यायालयाकडे अधिकचा वेळ मागितला होता. त्यांनी 30 जूनपर्यंत वेळ मागितला होता. यावेळी प्रत्येक पार्टीला दिलेले डोनेशन तपासून पाहणे वेळखाऊ असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र न्यायालयाने सोमवारी एसबीआयला डोनेशन तपासून पाहण्यास तुम्हाला सांगितलेले नाही.