बीड : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणमि महायुतीचा ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीसांकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दुसऱ्या कुणालाही निवडून द्या मात्र महायुतीचा एकही खासदार आणि आमदार निवडून देऊ नका, असं आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केलेलं आहे.
नेमकं काय म्हणालेत जरांगे पाटील
भाजपाचे काही जणं आपल्याविरोधात बनावट व्हिडीओ तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनापासून आपण लांब गेल्याचा संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. असं सांगत देवेंदं्र फडणवीस यांच्यासारखा खुनशी मंत्री पाहिला नाही, अशी टीकाही त्यांनी केलीय.
जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावीत, तसंच सगेसोयरे अध्यादेश निघावा, या प्रमुख मागण्यांवर जरांगे ठाम आहेत. मराठा आरक्षाबाबत विधानसभेत कायदा करुन १० टक्के आरक्षण दिल्यानंतरही कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरेच्या मागणीवर ते ठाम आहेत. सध्या राज्यभरात दौरे करुन जरांगे पाटील याबाबत सभा आणि भेटीगाठी घेतायेत.
मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. एकटया फडणवीसाने समाज वेठीस धरला आहे. पण तुझी गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका केली. भाजपचे लोक माझ्याबद्दलचा खोटा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. माझी एसआटी चौकशी सुरू आहे. सत्ता येत असते अन् जात असते. त्रास देऊ नका, असंही ते म्हणाले.