मुंबई
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. देशात आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान एआयएमआय़चे खासदार असुद्दीदीन ओवैसे यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. महात्मा गांधींनीही राम मंदिराचा उल्लेख केला नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले ओवैसी?
५०० वर्षांपासून मुस्लीम बाबरी मशिदीत नमाज पठण करत होते. काँग्रेसचे तेव्हाचे मुख्यमंत्री असलेले जी.बी पंत यांनी आदल्या रात्री अंधारात मशिदीत मूर्ती ठेवल्या. बाबरी मशीद माझी आहे, आणि राहणार. मात्र मूर्ती काढण्यात आल्या नाहीत. त्यावेळी तेथे नायर नावाचे कलेक्टर होत, यांनी मशीद बंद केली आणि तेथे मूर्ती पूजा सुरू केली आणि पुढे ते जनसंघाकडून खासदार झाले. १९८६ मध्ये मशिदीचं टाळं उघडण्यात आलं. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी भाजपने पाडली. महात्मा गांधींनीही तिथे राम मंदिर असल्याचा उल्लेख केला नाही. त्यांच्या आयुष्यातील रामाबद्दलचं महत्त्व म्हणजे नथुराम गोडसेने जेव्हा त्यांची हत्या केली तेव्हा ते ‘हे राम’ म्हणाले होते. भारतातील मुस्लीमांकडून बाबरी मशीद हिसकावून घेण्यात आली. विश्वासाच्या आधारावर येथे मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिर तोडून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आलेली नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/ANI/status/1748597184688423037/history
स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे, आता म्हणतात की दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये दर मंगळवारी हनुमान चालीसा, सुरजकांडचं पठण करवण्यात येईल. सरकारी शाळांचा कोणताही धर्म असतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या भाजपसह सर्वांनाच बहुमत मिळवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.