मुबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आता अवघे तीन-चार महिने शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी सुरु केली आहे तर दुसरीकडे महायुती देखील विधानसभेची निवडणूक एकत्रित लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासाठी लवकरच जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. यासाठी महायुती मधील मित्रपक्ष असलेली अजित दादांची राष्ट्रवादी विधानसभेत ८५ जागा घेणारच असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विधानसभेसाठी 85 जागा घेऊन असा दावा केला आहे. तसेच पक्षांच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी निवडणुकीला तयारीला लागण्याचे सांगितले. तसेच यावेळी आमदारांना काय करावे आणि काय करु नये? याची ही माहिती दिली आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मोठी मुसंडी मारली. राज्यात महायुतीत भाजपला 9, शिवसेना शिंदे गटाला 7 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली . महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला चांगलाच फटका दिला.हा पराभवाचा झटका बसल्यानंतर महायुतील मधील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि मेळावे सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ८० जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्वत: अजित पवार यांनीच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत .