ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार, उद्या राज्यसभेचा अर्जही भरणार!

मुंबई

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही तासात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आज दुपारी १२.३० वाजता पक्षप्रवेश होणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात अशोक चव्हाणांचा पक्ष प्रवेश पार पडेल. अशोक चव्हाण यांच्यासह आणखीही काही आमदार सोबत जाणार असल्याची चर्चा आहे.

आजच पक्ष प्रवेश का?
१५ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार होता. मात्र भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन मिळालं आहे. त्यात राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. या कारणास्तव अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करीत आणि उद्या ते राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतील.

आधी मिलिंद देवरा, त्यानंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण यांनी एकामागोमाग पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. डॅमेज कंट्रोलसाठी कालपासून काँग्रेसचे ज्येष्ठे आमदारांशी संपर्क साधत आहेत. त्यासाठी आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ही बैठक बोलावली असून ते आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे ज्येष्ठ नेते आजच्या बैठकीला उपस्थित राहतील. आज दुपारी १ वजात ही बैठक पार पडेल.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात