X: @therajkaran
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करण्यात आला आहे. (Rahul Narvekar email hacked) हॅकर्स एवढ्यावरच थांबला नसून त्याने या मेलवरुन थेट राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना मेल करत त्यामध्ये आमदारांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे. या हॅकींग प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Narvekar) यांना ईमेल हॅक (Email Hack) झाल्याची बाब सोमवारी दुपारी चार वाजता लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी मुंबईतील मरीन लाईन्स (Mumbai) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
विधानसभा अध्यक्षांची सायबर सुरक्षा भेदणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याचवेळी विधिमंडळाची सायबर सुरक्षा अधिक चांगली करण्याचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे दरम्यान, या मेलमध्ये (E -Mail) आमदार सभागृहात नीट वागत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी (Demand) करण्यात आली आहे.
राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. विधानसभेतील अनेक संवेदनशील बाबी त्यांच्याकडे आहेत. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कोणाचा या प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यापूर्वी शिवसेना (Shivsena) कोणाची याचाही निकाल दिला होता. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना मेल करण्यात आला होता. यामुळे त्यांचा मेल हॅक होण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. परंतु एकंदरीत विधिमंडळातील सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहे.
Also Read: छत्रपती शाहूनीं हातात मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल : संजय राऊत