X: @therajkaran
आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) कोल्हापूरातील (Kolhapur) जागा महाविकास आघाडीकडून (MVA) कोण लढवणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. शाहू महाराज (Shahu Maharaj) हे या जागेवरून महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार असतील, अशीही चर्चा होत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, छत्रपती शाहू यांना आम्ही मानतो. त्यांचा प्रचंड मान आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. शाहू महाराज यांच्याशी मी स्वतः जाऊन कोल्हापुरात या विषयावर चर्चा करेन. छत्रपती यांनी हातात मशाल धरली तर आम्हाला आनंद आहे, महाराष्ट्र उजळून निघेल, असं राऊत (Raut) म्हणाले.
ते म्हणाले, आम्हाला शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या बरोबर चर्चा करून त्यांना विनंती करावी लागेल की, ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल (Mashal) या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यत आहे का? असं राऊत म्हणाले. ते शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडी (MVA) मध्ये यावे. आमच्यावर दबाव आहे की ती जागा शिवसेनेने सोडू नये.
तीस वर्षापासून या ठिकाणी शिवसेना निवडणूक लढवीत आहे. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेने जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागावर चर्चा करायची नाही, हे जागा वाटपातील सूत्र आहे. शाहू महाराज (Shahu Maharaj) यांचा विषय आम्ही राज्यसभेसाठी घेतला होता. शाहू महाराज यांची लोकसभेच्या जागेसाठी लढण्याची चर्चा अद्याप आमच्यासोबत झाली नाही. काँग्रेसने काय सांगितले आहे, मला माहित नाही, असं संजय राऊत (Raut) म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी (VBA) महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चेवरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीमध्ये चर्चा होते. नेत्यांचा आग्रह असतो. कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. कोणती मागणी केली असेल तर नक्की चर्चा होते. आता प्रकाश आंबेडकर (Prakash Aabhedkar) यांची यादी आली आहे. त्यांची देखील इच्छा आहे. यावर लवकरच चर्चा होणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.