ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गणपत गायकवाडांच्या अडचणी वाढल्या, शेतकऱ्यांकडून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

ठाणे

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र आहे. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगर-हिल लाईन पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणमधील द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. सध्या आमदारांसह आरोपींना न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात ६ गोळ्या झाडल्या. जागेच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांचा सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे.

ज्या जागेवरुन वाद सुरू होता, त्या प्रकरणात भाजप आमदारांसह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात ३१ जानेवारी रोजी जागेवरुन गायकवाडांमध्ये वाद झाला होता. यावेळी गणपत गायकवांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने जागा मालक शेतकऱ्यांनी यासंदर्भात अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात