मुंबई

लाडकी बहिण जोरात, गर्भवती महिला धोक्यात; बोरीवलीत महिलांची ससेहोलपट 

By Yogesh Trivedi

मुंबई: एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जोरजोरात डांगोरा पिटला जातोय आणि सुमारे दोन कोटी महिलांच्या खात्यात दर महिन्याचे दीड दीड हजार रुपये जमा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला गर्भवती महिलांना बोरीवली पूर्व येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयातून माता व बालक रुग्णालयात आणि तेथून परळच्या राजे एडवर्ड स्मृती बाह्य रुग्णालय (केईएम) येथे पाठविण्यात आहे.  गर्भवती महिलांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या प्रमाणावर ससेहोलपट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

सामान्य माणसाला हा द्राविडी प्राणायाम अशक्य होत असून यातून गर्भवती महिला, तिच्या पोटातील गर्भ यांना धोका निर्माण होण्याची भीती आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव असून सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. 

यावर राज्य सरकारने, आरोग्य खात्याने, संबंधितांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना शाखा क्रमांक १४ च्या शाखा संघटक सौ. कांचन सार्दळ यांनी केली आहे.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव