मुंबई
अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालात शरद पवार गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे.
यापुढे शरद पवार गटाला उद्यापर्यंत नवं नाव आणि चिन्हाचा प्रस्ताव निवडणूक आयोगापुढे सादर करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: हजेरी लावताना पाहायला मिळाले होते. निवडणूक आयोगाकडून शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा निकाल वेगळा येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. दरम्यान राज्यसभा निवडणूकीपुर्वीच मोठा निर्णय समोर आला आहे.
जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड केलं होतं. यावेळी त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा केला होता. अजित पवारांनी ४० आमदारांच्या पाठिंब्याने स्वत:ला पक्षाचे नवे अध्यक्ष घोषित केले होते.