मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा (Navneet Rana) याना भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे . मात्र त्यांच्या या उमेदवारीला महायुतीत असणारा प्रहार पक्ष विरोधात आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. त्यांच्यानंतर आता भाजपही मैदानात उतरल्याची माहिती समोर आली आहे . विशेष म्हणजे भाजपच्या अमरावतीच्या स्थानिक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे नवनीत राणाच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
काहीही झाले तरी भाजपने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार करू नये अशी मागणी अमरावती येथील भाजपच्या 17 सदस्यीय गटाने फडणवीसांची भेट घेऊन केली आहे. तसेच भाजपच्या या स्थानिक नेत्यांनी नवनीत राणा विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याआधी बच्चू कडूंनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या स्वभाव कार्यकर्त्यांना मान्य नाही. ते त्यांना धमकावतात, त्यांनी वारंवार आमच्यावर आरोप केले. त्यामुळे कार्यकर्त्ये त्यांचा प्रचार करण्यासाठी तयार नाहीत, त्यामुळे महायुतीकडून नवनीत राणांची उमेदवारी मान्य नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं होत .बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde )यांनी बैठक बोलावून त्यांच्यासोबत चर्चा देखील केली आहे. पण, यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे याबाबत आणखी एक एकत्रित बैठक होणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
दरम्यान उमेदवारी प्रक्रिया सुरू होण्यास अवघा एकच दिवस शिल्लक असताना, अचानक भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या गटाने काल रात्री नागपुरात फडणवीस यांची भेट घेत त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला . मागील काही वर्षात अमरावतीत भाजप पक्षाची ताकद वाढत असून, बदललेल्या भाजपमध्ये ही पहिलीच वेळ आहे, की जिल्हा भाजपने एकजूट दाखवून वरिष्ठांपर्यंत कोणाची तर जाऊन नवनीत रानाच्या उमेदवारीवर विरोध दर्शवत तक्रार केली आहे. आता भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.