विश्लेषण महाराष्ट्र

भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय ठाकरे सेनेसाठी धोक्याची घंटा?

X : @NalawadeAnant

मुंबई – काय हेडिंग वाचून दबकलात ना…… थोडे थांबा. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे (Niranjan Dawkhare) निवडून आले. पण तिकीट वाटपावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) या महाविकास आघाडीतल्या प्रमुख पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी “आमची या मतदारसंघात ८५ हजार पदवीधरांची नोंदणी असल्याचा” ठाम दावा करत ही जागा शिवसेनेसाठी (UBT Shiv Sena) मागितली होती. तसे होते तसे उद्धव सेनेची मते कोणाला मिळाली? असा प्रश उपस्थित होत आहे. काँग्रेस (Congress) सोबत ठाकरे यांच्या शिवसेनेने “गेम” करत सांगली लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला का? अशी चर्चा कॉँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. ठाकरे

कोकण पदवीधर (Konkan Graduate Constituency) ही जागा महाविकास आघाडीतल्या (Maha Vikas Aghadi) मित्रपक्ष काँग्रेसला देण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे यांच्या सेनेच्या गटाचे नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “आमची मतदार नोंदणी ८५ हजार असल्याचा” ठाम दावा भर पत्रकार परिषद घेऊन केला होता. तर काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर (Ramesh Keer) यांनी त्यांची सव्वालाख मतदार नोंदणी असल्याचा दावा केला होता. मग प्रश्न पडतो की डावखरे यांचा विजय कसा झाला? ठाकरे यांच्या शिवसेनेने (Uddhav Sena) या मतदार संघात हाराकिरी करत लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha elections) आपल्या उमेदवाराच्या पराभवाचे उट्टे काढत भाजपशी (BJP) पडद्याआड उलाढाल केली का? अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

अशी पाडापाडी झाली असेल तर आगामी विधानसभा निवडणूक (Assembly elections) हि खऱ्या अर्थाने उध्दव ठाकरे यांना खास करून कोकणात (Konkan) डोईजड जाईल अशी चर्चा आहे. ठाकरे व काँग्रेस यांच्या मतदार नोंदणीची गोळाबेरीज केली तर ती पावणे दोन लाखापर्यंत जाते. मग प्रश्न असा पडतो की काँग्रेसच्या उमेदवाराला दगाफटका होतोच कसा? आणि जर उध्दव ठाकरे यांच्या बाजूने खरंच सहानुभूती आहे, असा जो दावा ठाकरे गटाकडून सातत्याने केला जातो, त्यातही कोकण या स्व .बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या अभेद्य गडात ठाकरे यांना मतदारांनी नाकारणे म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता येईल, कोकणातून ठाकरे यांच्या शिवसेनेचा सुपडा साफ होण्याची ही धोक्याची घंटा आहे आणि ती ठाकरे यांच्यासाठी घातक असल्याचे मानले जाते.

कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा झालेला पराभव हायकमांडच्या जिव्हारी लागला असुन आगामी विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे यांना सोबत घ्यायचे की स्वबळावर निवडणुक लढवायची, यावर गंभीरतेने विचार केला जात असल्याचे काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना सांगितले. आगामी दोन तीन महिन्यांच्या काळात काँग्रेस आपला पूर्ण फोकस फक्त कोकणावर केंद्रित करणार असल्याचेही या नेत्याने स्पष्ट केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात