ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढ्याचा गड राखण्यासाठी भाजपचा डाव ; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोहिते पाटलांच्या होमग्राउंडवर विराट सभा

मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha constituency) धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party) राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. आता या मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढल्या असून हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने नवा डाव आखत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांना मैदानात उतरवण्याच ठरवलं आहे. येत्या 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी हे माळशिरस म्हणजे मोहिते पाटील यांच्या होमग्राऊन्डवर सभा घेणार आहेत. त्यामुळे या सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .

माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ. हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला… २००८ ला माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली, त्यावेळेस पहिले उमेदवार हे शरद पवार होते आणि त्या मतदारसंघातून ते तीन लाखाहून अधिक अशा प्रचंड बहुमताने निवडून आले होते. त्यामुळे या मतदारसंघाची देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी अकलूज येथे पंतप्रधान मोदी यांची अशीच विशाल सभा घेऊन दाखवली होती. आता मोहिते आणि उत्तम जानकर सोबत नसताना त्यांच्या विरोधात तशीच मोठी सभा घेणे हे भाजपासाठी मोठे आव्हान असणार आहे. माळशिरस येथे 1 लाख लोकांची विराट सभा घेतली जाणार असून यासाठी भाजपसह सर्व मित्रपक्ष तयारीला लागले असल्याची माहिती माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. या सभेसाठी पंतप्रधान मोदींसोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis) , अजित पवार (Ajit Pawar)यांच्यासह अनेक नेते हजेरी लावणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीची ही सभा इतिहास घडवणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय.

दरम्यान माळशिरस हा मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे भाजपने माळशिरस येथेच मोदींची सभा घेण्याची तयारी केल्याने मोहिते पाटील आणि जानकर यांच्यासाठी हा मोठा झटका असणार आहे. आमदार जयकुमार गोरे, आप्पासाहेब देशमुख, राजकुमार पाटील के के पाटील यांनी माळशिरस येथील कृषी विभागाच्या जागेची पाहणी करीत येथे कामाला सुरुवात केली आहे. एकूण 60 एकरापेक्षा मोठ्या असणाऱ्या या मैदानावरील 28 एकर जागेत ही सभा होणार असून इतर जागा पार्किंगसाठी वापरण्यात येणार असल्याचं आमदार गोरे यांनी सांगितलं आहे .या सभेतून पंतप्रधान कॊणावर निशाणा साधणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात