मुंबई ताज्या बातम्या

रिक्त जागा असूनही प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना अग्नीशामक पदी नियुक्ती नाही?

१४० उमेदवारांना हक्काच्या नोकरीपासून मुकावे लागले ! X : @Rav2Sachin मुंबई: मुंबई अग्निशमन दलात अग्नीशामक पदाच्या भरती प्रक्रियेतील मोठी माहिती Rajkaran.com  च्या हाती लागली आहे. या माहितीतून स्पष्ट होत आहे की, रिक्त जागा असूनही प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची  अग्नीशामकपदी नियुक्ती करण्यात आलेले नाही.  यासंदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे (Fire Brigade Department) प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांच्याशी संपर्क साधून वारंवार प्रतिक्रिया […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजपच्या विद्वेषी व विभाजवादी राजकारणाला हद्दपार केले : नाना पटोले 

X : @therajkaran मुंबई: जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) व नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) आघाडीने बहुमत मिळवले आहे. जम्मू व काश्मीर या दोन्ही भागात इंडिया आघाडीने (INDIA alliance) मोठा विजय मिळवला आहे. छोटे पक्ष व अपक्ष यांच्या मदतीने मतविभाजनाचा भाजपचा डाव हाणून पाडत जनतेने भाजपला हद्दपार केले […]

महाराष्ट्र

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवण्याचे शरद पवार यांचे संकेत 

इंदापूर (पुणे): निवडणुकीत मला स्वत:ला उभं राहायचं नाही. जनतेने मला 14 वेळा निवडून दिले. त्यातल्या सात वेळा इंदापूर तालुक्यातील जनतेने मला मतं दिली. त्यामुळे आता मला स्वत:साठी काहीच मागायच नाही. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे जीवन बदलायचं आहे. हे करायचं असेल, तर ज्यांच्याकडे कर्तृत्व, अनुभव, प्रशासन आहे अशाही लोकांची गरज आहे. त्याची पूर्तता […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये “शिवनेरी सुंदरी”!

X : @NalawadeAnant मुंबई :  मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये (e-Shivneri ST Bus) प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे.  प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा एस. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतील मविआचे यशाने उत्साह

X : @therajkaran मुंबई: महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मिळालेले यश हे पक्ष आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे ठरले आहे. आता विधानसभा निवडणूकीसाठी (Assembly election 2024) जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उमेदवार निवडीच्या बैठका सुरु असताना घाटकोपर पश्चिम विधानसभा (Ghatkopar West Assemby constituency) मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारीसाठी अॅड. अमोल मातेले (Adv Amol […]

महाराष्ट्र

बदलापूर: “त्या” आंदोलकांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्या : राष्ट्रवादीचे कॅप्टन आशिष दामले यांची अजित पवारांना विनंती

@therajkaran बदलापूर: शहरातील आदर्श विद्यालयातील (Adarsh School) दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची शासन आणि पोलिसांनी दखल घ्यावी यासाठी सर्वसामान्य बदलापूरकर नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. यात काही गृहिणी तसेच विद्यार्थी देखील आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार करता हे गुन्हे मागे घेण्यात यावे, यासाठी शहरातील सजग युवक नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्री छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल!

X : @therajkaran मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती भुजबळ यांच्या कार्यालयातून सांगण्यात आली. पुण्यात असलेल्या भुजबळ यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईत दाखल करण्यात आले. भुजबळ सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. भुजबळ यांची […]

महाराष्ट्र

संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा;  आशिष शेलार यांची मागणी

X : @NalawadeAnant मुंबई – शिवसेना उध्दव ठाकरे शिवसेनेचे नेते, युवा सेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मागील २५ वर्षात जी निकृष्ट दर्जाची कामे केली त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत आहे. बुधवारी मुंबईत पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत,असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केला. प्रदेश कार्यालयात घेतलेल्या […]

महाराष्ट्र

तासभराच्या पावसातच मुंबई ठप्प होण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच जबाबदार : आ.आदित्य ठाकरे यांचा आरोप

X : @NalawadeAnant मुंबई – मुंबई, ठाणे आणि पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस होऊन जनजीवन विस्कळीत झाले. तर मुंबई तासभराच्या पावसातच पाण्याखाली जाऊन ठप्प झाली. यात नागरिकांचे मोठे हाल झाले. मात्र, राज्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसले नाहीत, असे सांगत उध्दव ठाकरे यांच्या सेनेचे नेते, युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जबाबदार धरत थेट त्यांच्यावरच निशाणा साधला. […]

महाराष्ट्र

मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी : सांस्कृतिक मंत्र्यांचे आवाहन 

X : @NalawadeAnant मुंबई – आमचे सरकार नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलत होते.  ते म्हणाले, मुंबई, कोल्हापूरप्रमाणे लवकरच नागपूरमध्ये सुद्धा १५० एकर जागेमध्ये फिल्म सिटी तयार करण्यात […]