मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ठाण्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या डोळ्यांना त्रास जाणवत होता. डॉक्टरांकडून तपासणी करून घेतल्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आज शुक्रवार सकाळी ९ वाजता त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चष्म्याचा नंबर बदलला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जवळचं अंधूक दिसू लागलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आणि ठाण्यात शस्त्रक्रिया करून घेतली. गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी नातू रूद्रांश याचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी राज्यभरात सुरू आहे. जागावाटपावरही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. दुसरीकडे नवी मुंबईतील अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन प्रलंबित आहे.