ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरवणार; 18 जानेवारीपासून काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठका

मुंबई


लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व विभागात विभागनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. १८ जानेवारी रोजी अमरावती येथून या बैठकांना सुरुवात होत आहे. नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होणार आहेत.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे, आ. यशोमती ठाकूर, आ. प्रणिती शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील, राज्यातील माजी मंत्री, जिल्हा अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दोन सत्रात या बैठका होणार आहेत. विभागीय बैठक सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान व दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होणार आहेत.

अमरावती विभागाची बैठक अमरावती यथे दिनांक १८ जानेवारी रोजी, नागपूर विभागाची बैठक नागपूरात दिनांक २० जानेवारी रोजी, पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुणे येथे दिनांक २३ जानेवारी रोजी, कोकण विभागाची बैठक भिवंडी येथे २४ जानेवारी रोजी, उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळे येथे २७ जानेवारी रोजी तर मराठवाडा विभागाची बैठक लातूर येथे दिनांक २९ जानेवारी रोजी होणार आहे.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात