मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Corpoartion Elections) पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्यातील प्रचारासाठी स्टार प्रचारकांची (Star campaigner of Congress) अधिकृत यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे (Election Commission) ही यादी सादर करण्यात आली असून, पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख संघटनात्मक चेहरे या यादीत समाविष्ट आहेत.
या यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (MPCC President Harshvardhan Sapkal), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, सतेज उर्फ बंटी पाटील, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त युवक काँग्रेस, महिला काँग्रेस तसेच अल्पसंख्याक विभागातील प्रभावी नेत्यांनाही प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूण ४० नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे या अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे आणि आक्रमक पद्धतीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असून, ही स्टार प्रचारकांची यादी त्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक प्रश्न, महागाई, बेरोजगारी, नागरी सुविधा आणि सत्ताधारी पक्षांच्या अपयशावर लक्ष केंद्रित करत काँग्रेस प्रचार करणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

