मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला आहे .त्यानंतर आता मनसेत हालचालींना वेग आला असून मनसेकडून महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारासाठी समन्वयक समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीत मनसेचे नेते, सरचिटणीस आणि राज्य उपाध्यक्ष यांचा समावेश आहे.यामध्ये. राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पुण्याचे तर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar)हे शिर्डी, अहमदनगरचे समन्वयक असणार आहेत.
मनसेकडून मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात समन्वयक जाहीर करण्यात आले आहेत . जाहीर करण्यात आलेल्या यादीत मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदारसंघांसाठी बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देण्याच्या भूमिकेला धरून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी (Lok Sabha Election) पक्षाचे नेते व सरचिटणीस यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्याचे समन्वयक म्हणून अभिजित पानसे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. तर अविनाश जाधव यांना पालघरचे समन्वयक म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. आमदार राजू पाटील यांना भिवंडी आणि कल्याणचे समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. याशिवाय अविनाश जाधव यांनाही कल्याण आणि भिवंडीच्या समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यात चार समन्वयक नेमण्यात आले आहेत. यामध्ये अमित ठाकरे, राजेंद्र (बाबू) वागस्कर, किशोर शिंदे, बाळा शेडगे यांच्या नावांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यासाठी तीन समन्वयक नेमण्यात आले आहेत. अभिजित पानसे, किशोर शिंदे, गणेश सातपुते अशी नाशिक जिल्ह्याच्या समन्वयकांची नावे आहेत.
दरम्यान जळगाव जिल्ह्याची जबाबदारी अभिजित पानसे यांना देण्यात आली आहे. ते या जिल्ह्याचे एकमेव समन्वयक असणार आहेत. शिरुर लोकसभेसासाठी राजेंद्र (बाबू) वागस्कर आणि अजय शिंदे यांना समन्वयक म्हणून नेण्यात आलं आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई मावळची जबाबदारी देण्यात आली आहे. मावळसाठी सरदसेाई यांच्यासह रणजित शिरोळे आणि अमेय खोपकर यांना समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर नितीन सरदेसाई यांना रायगड जिल्ह्याच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत संदीप देशपांडे यांनाही रायगडची जबाबदारी देण्यात आली आहे. रत्नागिरी/सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव यांना समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिर्डी आणि अहमदनगरसाठी बाळा नांदगावकर आणि संजय चित्रे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांची देखील जबाबदारी बाळा नांदगावकर यांना देण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये बाळा नांदगावकर यांच्यासोबत संतोष नागरगोजे हे देखील समन्वयक असणार आहेत.