पुणे
कोविडची बाधा झाल्याने पुणे येथील निवासस्थानी क्वारंटाईन राहून उपचार घेत असलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे आज ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले.
धनंजय मुंडे यांनी घरूनच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 113व्या बैठकीस ऑनलाइन पध्दतीने उपस्थिती लावली. या बैठकीत कृषी परिषदेच्या 112व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले.
कृषिमंत्री धनंजय मुंडे हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
धनंजय मुंडे हे मागील 5 ते 7 दिवसांपासून कोविड बाधित असून ते पुणे येथील निवासस्थानी उपचार घेत आहेत. आजपासून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने कामकाजास सुरुवात केली आहे.