मुंबई: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘बालसखी पुरस्कार २०२४’ साठी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार सोहळा ३ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, अदिती तटकरे, योगेश कदम, मेघना बोर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांनी श्रीकांत धिवरे यांचे अभिनंदन केले असून, पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
पुरस्कार सोहळ्यासाठी निवड झाल्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.