X: @therajkaran
मुंबई: देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmers’ protest) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Modi Sarkar) निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, नरेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली 2020 साली शेतकऱ्यांचे जेव्हा आंदोलन झाले होते, तेव्हा 720 साली शेतकऱ्यांना मृत्यू पत्करावा लागला, कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले, आता उद्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही त्यांच्यावर रणगाडे चालवणार का? राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांना येऊ दिल जात नाही. राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे का? असा हल्लाबोल राऊतांनी चढवला आहे.
राऊत म्हणाले, दिल्लीमध्ये ब्रिटिशांचाही दरबार भरत होता आणि शेतकरी ब्रिटिशांच्या (British) दरबारातही आपली मागणी मांडत होते, पण मोदींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडता येत नाहीत, देशाच्या राजधानीत जाता येत नाही, मुंबईत येता येत नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, म्हणून आज सर्व मिळून आम्ही आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी चर्चा करू. (PM Modi) मोदी चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. यवतमाळ वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. मोदींनी असे पाच प्रकल्प दाखवले पाहिजे जे मोदींनी केले आहेत, मोदींनी दहा वर्षात जी उद्घाटन केली आहेत, ते प्रकल्प 2014 च्या आधीचे आहेत, मोदी आणि त्यांचे सरकार नेहमीच खोटं बोलत आलं आहे, आता दोन-तीन महिने राहिले आहेत, खोटे बोलण्याची जी नशा आहे ती करून घ्या असं राऊत म्हणालेत.
ते म्हणाले, दहा वर्ष नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल ही पंतप्रधान मोदींची गॅरंटी होती, पण दहा वर्षानंतर सुद्धा एकही गॅरंटी शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण झालेली नाही. उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.