राष्ट्रीय ताज्या बातम्या

ईपीएस कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तीवेतन दरमहा नऊ हजार मिळावे; कॉँग्रेस खासदार शाहू छत्रपती यांची मागणी

X : @therajkaran

कोल्हापूर : ईपीएस – ९५ अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तिवेतन दरमहा नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवून भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडले जावे, अशी आग्रही मागणी कॉँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती (Congress MP Shahu Chhatrapati) यांनी लोकसभेत (Lok Sabha) केली.

पेन्शन (Pension) महागाईपासून संरक्षित नाही, शिवाय गेल्या दहा वर्षांत त्यात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही, याकडेही सभाध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले. ईपीएस- ९५ योजनेशी देशभरातील ७५ लाख निवृत्तिवेतनधारक संबंधित आहेत. पेन्शनधारकांची दयनीय अवस्था आहे. त्यांना किमान १४५१ रुपये इतके तुटपुंजे निवृत्तिवेतन दिले जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरची (gas cylinder) किंमत १२०० रुपये आहे. अशा परिस्थितीत सरासरी १४५१ रुपयांमध्ये जगायचे कसे, असा सवाल शाहू छत्रपती यांनी उपस्थित केला.

आकडेवारी सांगते की “पेन्शन-फंड”मधील कॉर्पस् (Retirement Corpus fund) वाढला आहे. २०१७-१८ मध्ये तीन लाख ९३ हजार कोटी वरून २०२२-२३ मध्ये सात लाख ८० हजार कोटी इतकी रक्कम वाढली आहे. सन २०२२-२३ मध्ये पेन्शन कॉर्पसवर ५१ हजार कोटी रुपयांचे व्याज मिळाले; पण वाटप करण्यात आलेली १४ हजार ४०० कोटी पेन्शन तुटपुंजी होती. मिळालेल्या व्याजाची रक्कम दरमहा किमान पेन्शन नऊ हजारपर्यंत वाढवण्यासाठी पुरेशी आहे, याकडेही खासदार शाहू छत्रपती यांनी लक्ष वेधले.

नैसर्गिकरीत्या वृद्धापकाळ असलेल्या पेन्शनधारकांच्या उद्ध्वस्त जीवनाबद्दल सरकारची उदासीनता धक्कादायक आहे. घटनेच्या कलम ४१ मध्ये वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनांची तरतूद आहे आणि म्हणूनच ते केवळ वृद्ध निवृत्तिवेतनधारकांनाच नाही, तर आजारी आणि अपंगांनादेखील समाविष्ट करते. सरकारने वाजवी पेन्शन ही वृद्धापकाळातील सर्वांत महत्त्वाची सुरक्षा आहे हे जाणून घेतले पाहिजे. म्हणूनच या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि पेन्शनधारकांना न्याय द्यावा, अशी विनंती शाहू छत्रपती यांनी सभागृहात केली.

शाहू छत्रपती यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली येथील जंतरमंतर येथे ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या (EPS-95 pensioners) धरणे आंदोलनास भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच लोकसभेत या विषयावर आवाज उठविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी मंगळवारी हा विषय उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे