मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )जोरदार मुसंडी मारली असल्याने राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला( mhayuti )मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट उपमुख्यमंत्रीपद सोडून भाजप (BJP) पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे .त्यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी म्हटले की, माझी पक्षाला विनंती आहे कि , मला सरकारमधून मोकळं करा ,जेणेकरून आपल्या पक्षसंघटनेत ज्या काही कमतरता राहिल्या आहेत, त्या दूर करण्यासाठी मला वेळ देता येईल. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मला पूर्ण वेळ द्यायचा आहे . त्यामुळं यासंदर्भात मी पक्षाच्या वरिष्ठांना विनंती करणार आहे आणि त्यांच्या सल्ल्याने पुढच्या गोष्टी करणार असेह फडणवीस यांनी म्हटले आहे .
दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांनी प्रतिक्रिया दिली आहे. , एका निवडणुकीत हार -जीत झाली म्हणून आम्ही खचून जाणारे नाही आहोत . या एका निवडणुकीत हार मिळाली म्हणून सर्व काही संपत नसतं आपण टीम म्हणून आम्ही एकत्र काम करत राहणार असे ते म्हणाले आहेत .यावर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी नक्की बोलेन आणि राज्यासाठी एकत्र काम करु. आम्ही एकत्र काम केलं आणि निवडणुकांचे निकाल चांगले आणणे त्याची आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुणाच्या एकट्याची जबाबदारी आहे, असं म्हणणारा मी कार्यकर्ता नाही. त्यामुळे मी नक्की त्यांच्याशी बोलेन”, असं मुख्यमंत्री म्हणाले .
या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मात्र भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील या धक्कादायक निकालावर ही देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार असल्याचं ते म्हणाले . तसेच त्यांनी भाजपचा पराभव झाला असला तरी आमच्या मतदानाची टक्केवारी महाविकास आघाडीपेक्षा जास्त असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेले आहे. देशभरातील भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. पंडीत नेहरु यांच्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद जनतेने मोदींना दिला. त्याबद्दल जनतेचे आभार, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.