X: @therajkaran
मुंबई: एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (RajThackeray) यांचे दौरे वाढले आहेत. आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा (Vidhan Sabha) निवडणुकीचे रणशिंग नाशिकमधून फुंकण्याचा निर्णय मनसेकडून घेण्यात आला आहे. तर मनसेच्या (MNS) वतीने शहरभर लावलेल्या होर्डिंग्सवर ‘लढायचं ते जिंकण्यासाठीच’ हा मजकूर लिहला आहे. तसेच लढण्याची हिंमत ठेवणारा संपत नसतो! 18 वा वर्धापन दिन असा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या होर्डिंग्सची जोरदार चर्चा सुरु आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 7 मार्चला नाशिक शहरात येणार असून 9 तारखेला दादासाहेब गायकवाड सभागृहात वर्धापन दिनानिमित्ताने त्यांची तोफ धडाडणार आहे. कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शनपर भाषण करणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) रणशिंग ते नाशिकमधून फुंकणार असून भाषणात ठाकरे नक्की काय बोलणार? महायुतीसोबत जाण्याची ते काही घोषणा करणार की स्वबळाचा नारा देणार? याकडे राजकीय निरीक्षकांची लक्ष लागलेले आहे.
नाशिकमध्ये मनसेचे ७, ८ आणि ९ मार्चला कार्यक्रम असणार आहेत. सात मार्चला पक्षाचे प्रमुख राज ठाकरे (RajThackeray ) नाशिकमध्ये येतील. आठ मार्चला सकाळी मनसेत काही प्रवेश होतील. त्यानंतर नऊ मार्चला मनसेच्या वर्धापनदिनी दादासाहेब गायकवाड सभागृहात पक्षाचा राज्यव्यापी मेळावा होईल. पक्षाचे राज्यभरातील प्रमुख नेते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मनसेच्या 18 व्या वर्धापन दिनाचा सोहळा यंदा नाशिकमध्ये (Nashik) पार पडणार आहे. यानिमित्त नाशिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.
Also Read: मोदींनीच फुगविलेला ‘मोदी परिवार’ नावाचा फुगा जनताच फोडणार : ठाकरे गटाचा हल्लाबोल