राष्ट्रीय ताज्या बातम्या विश्लेषण

…या तीन कारणांसाठी उद्धव ठाकरे लढू शकतील लोकसभेची निवडणुक

Twitter : @vivekbhavsar

मुंबई

2024 च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. भाजपाप्रणित एनडीए (NDA) आणि विरोधकांचं ऐक्य असलेल्या “इंडिया”त (INDIA) हा सामना चांगलाच रंगणार आहे. महाराष्ट्रातही भाजपा आणि मविआच्या तिन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येतोय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटासाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election 2024) जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे आव्हान ठाकरे गटापुढे असणार आहे. त्यामुळेच ठाकरे गटातील बडे नेते या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. राज्यसभेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेही ईशान्य मुंबईतून निवडणूक लढण्याची चर्चा सुरु आहे. पक्षाने आदेश दिला तर जेलमध्येच काय, निवडणूकही लढवेन असे सांगत संजय राऊत (Sanjay Raut interested is likely to field LS Polls from Mumbai North East Constituency) यांनी एकाअर्थी या चर्चेला दुजोराच दिल्याचं मानण्यात येतंय. अशातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray is likely to contest LS polls) लोकसभेच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे, त्यासाठी 3 प्रमुख कारणं सांगण्यात येत आहेत.

  1. राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्यासाठी गरजेचे
(file picture शरद पवार यांच्यासोबत नरेंद्र मोदी )

ठाकरे गटाकडून येत्या काळात उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय असतील असं सांगण्यात येतंय. ठाकरे यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ‘इंडिया’त असलेल्या घटक पक्षांत ठाकरे गटाला विशेष महत्त्व मानण्यात येतंय. भाजपाच्या हिंदुत्वासमोर, ठाकरेंचं हिंदुत्व उभं करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) रोखण्याचाही विरोधकांचा डाव असण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राजकारणात आगामी काळात स्थान निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंना खासदारकीची निवडणूक लढवणं आवश्यक असल्याचं मानण्यात येतंय. ‘इंडिया’ या विरोधकांच्या ऐक्यातही उद्धव ठाकरेंना समन्वयकाची मोठी संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी निर्माण केलेल्या संभ्रमानं ही जबाबदारी ठाकरेंकडे येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ते लोकसभा निवडणूक लढवतील की इंडियाच्या समन्वयकाची? याचा निर्णय त्यांना करावा लागणार आहे.

  1. महाविकास आघाडीची ताकद वाढेल

उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर बंडानंतर उद्धव ठाकरे थेट भाजपाच्या विरोधात रणांगणात उतरल्याचं पाहायला मिळेल. महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) राज्यातील लोकसभा निवडणुकांचा चेहरा उद्धव ठाकरेंना होण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे. मविआच्या (MVA) राज्यातील प्रमुख प्रचार सभांमध्ये उद्धव ठाकरे थेट निवडणुकांच्या रिंगणात असल्यानं त्यांच्याबाबतची असलेली जनतेची सहानभूतीही मविआला राज्यात फायद्याची ठरु शकते. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या कमीत कमी जागा निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची उमेदवारी ही मोठी संधी मविआला असेल. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनीही त्यांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण केलेला आहे. शरद पवार गटही उद्या भाजपासोबत गेल्यास, पवार आणि भाजपावर टीकास्त्र सोडू शकणारे उद्धव ठाकरे हे एकमेव नेतृत्व असेल.

(file picture महाविकास आघाडी स्थापनेचा क्षण)
  1. ठाकरे गटात आणि शिवसैनिकांत नवा उत्साह

एकनाथ शिंदे यांचे बंड आणि सातत्यानं पक्षाला लागलेल्या गळतीच्या काळात उद्धव ठाकरे थेट रणांगणात उतरल्यास शिवसैनिकांत नवा उत्साह संचारण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी आत्तापर्यंत कोणतीही निवडणूक लढलेली नाही. ते मुख्यमंत्री झाल्यानंतरही विधान परिषदेवर निवडून गेलेत. ठाकरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर शिवसैनिक अधिक इर्षेनं राज्यभरात कामाला लागण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे कुठून लढवतील निवडणूक?

उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तर ते मुंबईतील दोन मतदारसंघापैंकी एकाची निवड करण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईत सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत (MP Arvind Sawant from South Mumbai constituency) हे खासदार आहेत, ही जागा उद्धव ठाकरेंसाठी अधिक सुरक्षित मानण्यात येतेय. तसंच शिवसेना भवन असलेल्या दक्षिण – मध्य मुंबईत (Mumbai South Central Constituency) शिंदे गटात गेलेल्या राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्याविरोधातही उद्धव ठाकरे उभे राहण्याची शक्यता आहे. मविआमुळे या मतदारसंघातील काँग्रेसची मतंही ठाकरे गटाच्या साथीला आल्यास या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा विजय या मतदारसंघातून सुकर ठरण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंच्या लोकसभा निवडणुकीत उतरल्यानं पक्षाला आणि मविआला ऊर्जा मिळेच, त्याचबरोबर त्यांच्याबाबत असलेल्या सहानभूतीचा फायदा लोकसभेत मविआ आणि ठाकरे गटाला घेता येणार आहे. मविआची एक जागाही उद्धव ठाकरे उभे राहिल्यानं नक्कीच वाढेल. आता उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार, याकडं सगळ्याचं लक्ष असेल.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे