ताज्या बातम्या महाराष्ट्र

Hatkanangle Lok Sabha : शिंदेंची नवी चाल; अपक्ष आमदाराच्या भावाला उतरवणार रिंगणात

X: @therajkaran

मुंबई: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle) जागावाटपावरून आणि उमेदवारावरून अजूनही संभ्रम आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे सध्या शिंदे गटात आहेत. पण त्यांच्याविरोधात नाराजी असल्याचे भाजपच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे, तर एकनाथ शिंदे मात्र आपला उमेदवार देण्यासाठी नवीन चाल खेळत आहेत. यासाठी शिरोळमधील अपक्ष आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर (Sanjay Patil Yadravkar) यांच्या नावावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

संजय पाटील यड्रावकर यांचं नाव अचानक चर्चेत आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर भाजपने कोल्हापूर किंवा हातकणंगले मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यानंतर भाजपने काहीशी माघारीची भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. त्या बदल्यात भाजपने आता हातकणंगले मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. भाजपकडून त्यांचे समर्थक आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांचं नाव पुढे आणण्यात आलं आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्यांनी राजू शेट्टी यांना समर्थन देण्यावर जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. राजू शेट्टी विरूद्ध विनय कोरे अशी लढत झाली तर या मतदारसंघातील चित्र बदलणार आहे.

या सगळ्या घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) मात्र ही जागा आपल्याकडेच राहावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. त्यामुळेच आता धैर्यशील माने यांच्या नावाला असलेला विरोध लक्षात घेता नवीन नावावर चर्चा केली जात आहे. अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात