मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात महायुतीला (MahaYuti)बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे . त्यानंतर आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर या लोकसभेसाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच महायुतीला पाठींबा देण्याचे स्पष्टीकरण ही दिले . ते म्हणाले , माझ्यासाठी भूमिका बदलणं आवश्यक होत .कारण या पाच वर्षात राज्यातील परिस्थिती बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )नसते तर राममंदीर उभं झालं नसतं. तसेच जम्मू काश्मीरमधील 370 कलम सारख्या गोष्टी घडल्या. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यावा असं पक्षानं ठरवलंय असं राज ठाकरे यांनी सांगितलं .
या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात आपल्याला धर्मावर राजकारण करायचे नाही. मात्र 1992 पासून 2024 पर्यंत रखडलेली एखादी गोष्ट,ज्यामध्ये अनेक कार सेवकांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली तरी पूर्ण झाली नाही . इतक्या वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला तरी देखील उभे राहिले नसते, असे म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामाचे कौतुक केले आहे. मी मोदींच्या पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला आहे. . पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत त्यामुळे त्यांचं गुजरात प्रेम स्वाभाविक आहे. इतरही राज्यांकडे आपल्या महाराष्ट्राकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. आता पुढे त्यांची पावले कशी पडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असे ते म्हणाले . याआधी .शरयू नदीमधील अनेक कार सेवकांची प्रेते तरंगत असल्याचे दूरदर्शनवर दाखवले जात होते. त्या सर्व कार सेवकांचा आत्मा आता शांत झाला असेल, असे म्हणत राज ठाकरे आणि राम मंदिर उभारण्याच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देताना महाराष्ट्रासाठी आमच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्या पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचतीलच,. यामध्ये मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा देणे, महाराष्ट्रातील गड किल्यांचे संवर्धन मादी महत्त्वाचे विषय असल्याचे त्यांनी सांगितले . एका बाजूला कडगुळ आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व त्यामुळे मी आणि पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले