मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) माढा लोकसभा (Madha Lok Sabha )मतदारसंघात भाजपविरोधात (BJP) नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत . या मतदारसंघात भाजपवर नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना (dhairyasheel mohite patil) आता माढ्यात शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याचं निश्चित मानलं जात आहे . याच पार्श्वभूमीवर उद्या अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर तीन बडे नेते एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी उद्या सकाळी 11 वाजता एकत्र येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या भेटीची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे .
या मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh Nimbalkar) उमेदवारी देण्यात आली आहे . त्यानंतर नाराज मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला . आता मात्र निबांळकर यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात भाजपच्या मित्रपक्षाकडून विरोध होत आहे. उमेदवार बदलाची सातत्यानं मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर फलटणमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली होती . दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णाय घेतल्यानंतर वेगानं घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्या या तीन बड्या नेत्यांच्या भेटीने माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं समीकरण सोपं होणार आहे. सुरुवातीपासून जयसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते पाटील हे शरद पवार यांच्याकडे जाण्यामुळं माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा भाजप गमावणार असल्याचा दावा केला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे (Praniti Shinde ) या निवडणूक लढवत आहेत. उद्याच्या भेटीत सुशीलकुमार शिंदे हेही येत असल्यानं सोलापूर लोकसभा जागेवर प्रणिती शिंदे यांना फायदा मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर मोहिते कुटुंबातील सदस्य हे उद्या दुपारी चार वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. यावेळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. कारण ते शिवरत्न येथे असणार आहेत