मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना हातकणंगले (Hatkanangale) आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आज कोल्हापूर आणि हातकणंगले दौऱ्यावर येत आहेत .या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत . हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane)तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)रिंगणात आहेत . त्यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठीच मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आहे. कोल्हापुरात आगमन केल्यानंतर ते हॉटेलवर विविध मान्यवरांच्या ते गाठीभेटी घेतील. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Vinayakrao Kshirsagar )यांच्या निवासस्थानी ते सांत्वन पर भेट देणार आहेत.आता या दौऱ्याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना , शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील रिंगणात आहेत .आता त्यात ताराराणी पक्षानेही उडी घेतली आहे . महायुतीने शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांना उमेदवारी दिली आहे .तर मविआकडून ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी (Raju Shetti) मैदानात आहेत. तर रघुनाथदादा पाटील (Raghunath Patil) यांनी कोल्हापूर, हातकणंगलेसह (Hatkanangale) नऊ जागांवर भारतीय जवान किसान पार्टी निवडणूक लढवणार असलयाचे सांगितले आहे .त्यानंतर आता आमदार प्रकाश आवाडे हे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरले आहेत .त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. .दरम्यान भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरल्याने धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हातकणंगलेतील शिलेदारांशी काय चर्चा करणार याकडे सुद्धा लक्ष आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याआधी दोन दिवसापूर्वीच त्यांनी कोल्हापुरातील गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना फोन करून कोल्हापूरच्या दोन्ही उमेदवारांना ताकद लावण्यासाठी सांगितले होते. डोंगळे यांनी सुद्धा उमेदवारांसाठी ताकद लावत असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर मुख्यमंत्री स्वतः कोल्हापुरात येत असल्याने आता कोणाकोणाच्या गाठीभेटी घेणार आणि दोन्ही उमेदवारांसाठी सकारात्मक वातावरण तयार करणार? याकडे सुद्धा लक्ष आहे.