X : @NalavadeAnant
नागपूर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांनी आपण कोणतेही चुकीचे काम करत नसल्याचे सांगत, आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान बुधवारी येथे दिले.
अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी आज सभागृहात बोलताना पुराव्याशिवाय आरोप केल्यानंतर, काही चुकीचं केलं असेल तर थेट कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देत असल्याचंही मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केलं. मंत्री लोढा म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात नाही. जर माझ्या कुटुंबियांकडून अवैध व्यवसाय (Illegal business) होत असेल तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो. आम्ही एकही अनधिकृत बांधकाम (illegal construction) केले नाही. आम्ही अनधिकृत व्यवसाय करत नाही. पदाचा गैरवापर करत नाही. तुम्ही पुरावे द्या, ते घेण्यासाठी मी स्वतः येतो. हे जे काही चाललंय ते बरोबर नाही. कोणाच्या कुटुंबाने कोणता व्यवसाय, नोकरी काही करायचाच नाही का? बेरोजगार बसून राहायचा का? माझं काम अतिशय पारदर्शक आहे, कुणी १ रूपयाचा माझ्यावर आक्षेप घेऊ शकत नाही!” असे जाहीर आव्हानच लोढा यांनी दानवे यांना दिले.