मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली असून महायुतीला मोठा धक्का बसला आहे . या निवडणुकीत महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला फक्त १ जागा मिळाली . यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे . या पार्शवभूमीवर राष्ट्ववादी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) आमदारांची तातडीची मुंबईत बैठक झाली. मात्र या बैठकीत नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, नरहरी झिरवळ, धर्मराव बाबा अत्रामस सुनील टिंगरे , अण्णा बनसोडे हे सहा जण अनुपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group ) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी अजित पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत , आता १५ दिवसात काय होतेय बघा असे विधान केल्यामुळे विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभेचा निकाल आल्यानंतरअजित पवार गटाच्या अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे, असा दावा – शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. विधानसभा लढवायची आहे. ते आपलं भविष्य बघतात. कोण्या पक्षासोबत फायदा यासाठी आमदारांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, असे ते म्हणाले. तसेच बालेकिल्ला असलेल्या बारामतीत जो निकाल लागला तो आश्चर्यकारक नाही. पवार कुटुंबात फूट पाडून त्यांच्याच घरातील उमेदवार द्यायचा. आणि पवार साहेब यांना बारामतीत अडकवून ठेवण्याचा भाजपकडून प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला. मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणूकीतंही महाराष्ट्रात चमत्कार घडणार, असा विश्वास दावा त्यांनी केला. या विधानसभ निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच येईल. विधानसभेसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे.असे ते म्हणाले . त्यामुळे आता अजित पवारांना धक्का बसणार आहे .
दरम्यान लोकसभेच्या निकालानंतर धास्तावलेले आमदार बाहेर पडण्याच्या भीतीने अजित पवार गटाने बैठका सुरु केल्या आहेत. अशातच अजित पवार गटाचे १० ते १५ आमदार पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. हे आमदार केव्हाही अजित पवारांची साथ सोडू शकतात, असे या सुत्रांचे म्हणणे आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात महाभूकंप होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .