मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच जागांवर मतदान होणार आहे. आता अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही. दरम्यान राज्यातील पाच जागांवर काँग्रेस आणि भाजप-शिवसेना उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे पाच जागावर निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे.
विदर्भातील अशा असणार लढती
नागपूर नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध आ.विकास ठाकरे (काँग्रेस)
रामटेक – राजू पारवे (एकनाथ शिंदेंची शिवसेना) विरुद्ध रश्मी बर्वे (काँग्रेस)
गडचिरोली अशोक नेते (भाजप) विरुद्ध डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस)
भंडारा-गोंदिया सुनील मेंढे (भाजप) विरुद्ध प्रशांत पडोळे (काँग्रेस)
चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आ. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
भाजपचे नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari)हे नागपूर लोकसभा(Nagpur Loksabha)मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे(Vikas Thakre) यांना उमेदवारी दिली आहे. नितीन गडकरी यांनी आपली रणनीती जाहीर केली आहे. त्यात जेवणासाठी जाऊ परंतु पिण्यासाठी जाणार नाही, टॅक्सी, बस देणार नाही. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना किती गर्दी होईल, हे दिसेल, असे त्यांनी म्हटले होते. राज्यातील नाही तर देशातील ही चर्चेतील लढत असणार आहे. या लढतीत गडकरी यांचे पारडे जड असणार आहे.
काँग्रेसने चंद्रपूरमधून स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर(Pratibha Dhanorkar) यांना तिकीट दिले आहे. त्यांच्याविरुद्ध भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar)मैदानात आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार(Shivani Wadittiwar)हिने तयारी सुरु केली होती. परंतु अखेर काँग्रेसने शिवानीची उमेदवारी नाकारत प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिले आहे. यामुळे विजय वडेट्टीवार काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे