ताज्या बातम्या महाराष्ट्र

केजरीवालांच्या अडचणीत वाढ : कोर्टाने सुनावली १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Admi Party) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कोर्टाकडून दणका मिळाला आहे. त्यांच्या अडचणीत आता आणखीनच वाढ झाली आहे. ईडीच्या (ED)कोठडीत असलेल्या केजरीवाल यांना राउज अवेन्यू कोर्टाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली आहे.त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

केजरीवाल यांची ईडी कोठडी संपल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केले होते.विशेष न्यायाधीश कावेरी बाजवा यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. न्यायालयीन सुनावणी दरम्यान ईडीकडून केजरीवाल चौकशीला सहकार्य करत नाहीत,दिशाभूल करतात असा आरोप देखील त्यांच्यावर ईडी करून करण्यात आला. यानुसार, कोर्टाने केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, केजरीवाल यांना तिहार तुरुंगात हलवण्यात येणार आहे.दरम्यान केजरीवाल यांना न्यायालयात हजार केले जात असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर घणाघात केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “प्रधानमंत्री जे करत आहेत ते देशासाठी योग्य नाही आहे, असे ते म्हणाले आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या अगोदर आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांना दिल्ली एक्साईज पॉलिसी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आप नेते सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक करण्यात आली होती. सध्या त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यांची चौकशी चालू आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात