मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आरोग्य विभागातील घोटाळा उघडकीस आणला आहे. राज्यातील आरोग्य विभागात (Arogya Vibhag )साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप करत त्यांनी अँब्युलन्स खरेदीत 539 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचाही गौप्यस्फोट केला आहे .तसेच या सर्व प्रकाराला आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) जबाबदार आहेतच एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी त्यांचे पद सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकांमध्येही भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले. या कंपन्यांना अँब्युलन्स चालवण्याचा अनुभव ही नव्हता तरी त्यांना टेंडर देण्यात आले .पिंपरी चिंचवडमधील अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीची सुमित कंपनी आहे. या प्रकरणात साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हाच पैसा निवडणूक निधी म्हणून देण्यात आला आहे. सावंत यांना मी पाच दिवसाचा वेळ देतो त्यांनी आपली बाजू मांडावी नाहीतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे . तसेच जनतेच्या पैशाचा फायदा आरोग्य विभाग घेत असून त्यात पारदर्शक प्रक्रिया राबवावी असा टोलात्यांनी लगावला . दुसरीकडे पाहिलं तर एका बाजुला बी व्ही जी बाबत अनेक तक्रारी आहेत, अनेक राज्यांत बी व्ही जी ब्लॅक लिस्ट कंपनी आहे. मात्र तरीही या कंपनीला कंत्राट देण्यात आले. स्पॅनिश कंपनी ब्लॅक लिस्ट आहे .सुमित कंपनीने या कंत्राटासाठीचे निकष ठरवले आणि त्यानंतर स्वतःच टेंडर भरले. काही दिवसांनी बी व्ही जी ला सहभागी करून घेतले, असे अनेक आरोप त्यांनी केले आहेत. मी या मुद्द्यावर मी आरोग्य मंत्र्यांशी जाहीर चर्चा करायला तयार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान याची फाईल पुढे पास कशी केली. देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही फाईल जाते. त्यांमी दुर्लक्ष केलं का? साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे कोण जबाबदार आहे? असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे, असंही पवार म्हणाले आहेत . निवडणुकीआधीच आरोग्य विभागातील घोटाळा उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .