मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमदेवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे . दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray )मतदारसंघातील उमदेवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे . एकूण चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, ज्यात कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha), हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanangle Lok Sabha ), जळगाव लोकसभा मतदारसंघ (Jalgaon Lok Sabha) आणि पालघर लोकसभा मतदारसंघाचा (Palghar LokSabha ) समावेश आहे.
यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा थेट सामना कल्याण लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. तर हातकणंगले मतदारसंघात माजी आमदार सत्यजित पाटील -सरुडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, महायुतीकडून धैर्यशील माने किंवा त्यांच्या आई माजी खासदार निवेदिता माने (Nivedita Mane) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच वंचितकडून राहुल आवाडे (Rahul Awade) मैदानात आहेत. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत रंगणार आहे .
पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कामडी (Bharti kamadi )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्यांच्याविरोधात. महायुतीत राजेंद्र गावित यांच्या नावाची चर्चा असून, त्यांना भाजपच्या स्थनिक नेत्यांचा प्रचंड विरोध होत आहे. तसेच, भाजपकडून विष्णु सवरा यांचे सुपुत्र डॉ. हेमंत सावरा यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे भारती कामडी यांचा सामना डॉ. हेमंत सावरा की राजेंद्र गावित यांच्याशी होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार (Karan Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात भाजपने स्मिता वाघ (Smita Wagh)यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता करण पवार विरुद्ध स्मिता वाघ अशी लढत रंगणार आहे .
याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांच्या पहिल्या यादीत 17 उमेदवारांची यादी (Lok Sabha Candidates list) जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत ठाकरे गटाने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी
1 बुलढाणा-नरेंद्र खेडेकर
- यवतमाळ- संजय देशमुख
- मावळ – संजोग वाघेरे- पाटील
- सांगली -चंद्रहार पाटील
- हिंगोली- नागेश अष्टीकर
- छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
- धाराशीव- ओमराजे निंबाळकर
- शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
- नाशिक- राजाभाऊ वाझे
- रायगड – अनंत गिते
- रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत
- ठाणे- राजन विचारे
- मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
- मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत
- मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर
- मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
- परभणी- संजय जाधव
- कल्याण _वैशाली दरेकर
- हातकणंगले – सत्यजित पाटील
- जळगाव -करण पवार
- पालघर – भारती कामडी