मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना दिल्लीत राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) तुरुंगात गेल्यानंतर आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढच होत चालली आहे . दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आप नेते राजकुमार आनंद (Rajkumar ananad) यांनी मंत्रीपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे केजरीवालांना आणि आपला मोठा धक्का बसला आहे
दिल्लीत राज कुमार आनंद हे समाजकल्याण आणि कामगार मंत्री होते. त्यांच्या घरांवर काही दिवसांपूर्वी ईडीने छापेमारी केली होती. ७ कोटींहून अधिकची सीमाशुल्काची चोरी केल्याचा आरोप आनंद यांच्यावर आहे. त्यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा देत पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे केजरीवाल व आपच्या अडचणी वाढल्या आहेत.आज मंत्रिपदाचा राजीनामा देताना आनंद यांनी पक्ष गेल्या काही काळापासून दलित आमदार, खासदार आणि मंत्र्यांना योग्य सन्मान देत नाही, असा आरोप केला आहे. दलितांना फसविण्यात आले आहे. अशात पक्षात राहणे कठीण बनत चालले आहे. यामुळे मी पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. .
दरम्यान केजरीवाल अटकेत असताना देखील त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही. तुरुंगातूनच ते सरकार चालवत आहेत. त्यामुळे केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे म्हणून दिल्ली हायकोर्टमध्ये (Delhi High Court )याचिक दाखल करण्यात आली होती.पण, हायकोर्टाने त्यांच्या जामिनासाठी केलेली याचिका आज फेटाळून लावली आहे . तसेच याचिकाकर्तेला खडे बोल सुनावत 50 हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे . त्यामुळे आज दिवसभरात आपला तीन धक्के सहन करावे लागले आहेत.