ताज्या बातम्या महाराष्ट्र

Khichadi scam : खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे सुरज चव्हाण यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

X: @therajkaran

कथित खिचडी घोटाळा (Khichdi scam) प्रकरणी ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीकडून (ED) चव्हाण यांच्याशी संबंधित ८८ लाख ५१ हजारांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यामध्ये मुंबईतील एक फ्लॅट आणि रत्नागिरीतील जमीन यांचा समावेश आहे. 

न्यायाधीश एम.जी देशपांडे (M. G. Deshpande) यांच्यासमोर हे आरोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणातील गैरव्यवहार रकमेतील सुमारे एक कोटी २५ लाख रुपये चव्हाण यांच्या वैयक्तिक बँक खात्यात आणि १० लाख रुपये त्यांची भागीदारी असलेली कंपनीच्या बँक खात्यात वळविण्यात आल्याचा आरोप आहे. या रक्कमेचा वापर चव्हाण यांनी मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायात गुंतवणूक (Investment in dairy business) करण्यासाठी केला, असा आरोप आहे. या गैरव्यवहारातील सुमारे एक कोटी ३५ लाख रुपये चव्हाण यांच्याकडे गेल्याचा आरोप असून त्याबाबत ईडी तपास करीत आहे. 

सूरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने १७ जानेवारी रोजी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सप्टेंबर २०२३ मध्ये याप्रकरणासंबंधित गुन्हा दाखल केला होता. खिचडी वितरणात ६ कोटी ३७ लाख रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामध्ये फसवणूक, फौजदारी, विश्वासघात, कट रचणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला गेला असल्याची माहिती आहे.

सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, सुजीत पाटकर, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागिदार व कर्मचारी, स्नेहा कॅटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी व संबंधित खासगी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ लावणे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या आधारावर ईडी तपास करीत आहे. याप्रकरणी १८ ऑक्टोबरला सूरज चव्हाण, तसेच खिचडीचे कंत्राटदार आदी एकूण आठ जणांवर छापे टाकण्यात आले होते.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात