X: @therajkaran
लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरमधून (Kolhapur Lok Sabha) शाहू महाराज यांना महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (MP Sanjay Mandlik) यांनी शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडल आहे. शरद पवार मोठे नेते आहेत. शाहू महाराजांना (Shahu Maharaj) निवडणुकीत उभं करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र आहे. शरद पवारांना जुना राग काढायचा असेल. पण जनता सुद्धा आता याला तयार आहे, असं म्हणत त्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
त्याच्या उमेदवारीबाबत मंडलिक म्हणाले, माझी उमेदवारी लवकरच जाहीर होईल. माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. मला खासदार डॉ श्रीकांत शिंदे (MP Dr Shrikant Shinde) यांचा फोन आला होता. मला अस्वस्थ आहात का? असं विचारलं. उमेदवारी जाहीर होईल, असं त्यांनी मला सांगितलं आहे. माझी उमेदवारी घोषित नसल्याने मेळाव्याला उपस्थित नव्हतो. मी उमेदवार म्हणून घोषित झाल्यावर महायुतीच्या (Mahayuti) सगळ्या पक्षांचा मेळावा घेईल. मी मुंबईत चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची भेट घेतली. समरजित घाटगे (Samarjeet Singh Ghatge) यांचीही भेट होत असते. महाडिक यांचेही सकारात्मक बोलणं झालं आहे. अनेक नावे चर्चेत होते. त्यामुळे माझ्या सोबत सरावाच्या कुस्त्या सुरू होत्या, असं संजय मंडलिक म्हणाले.
सतेज पाटील (Congress leader Satej Patil) माझे चांगले मित्र आहेत. सतेज पाटील पुन्हा माझ्या स्टेजवर येतील. मागच्या वेळी ते आले होते. व्यक्तिगत हेवा दाव्यातून लोकसभेच्या निवडणूक होऊ नयेत. सतेज पाटील यांना राज्याच्या राजकारणात इंटरेस्ट आहे, लोकसभेला वाटत नाही, असं मंडलिक म्हणालेत. लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा आज दुपारी होऊ शकते. अशातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.