मुंबई
कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेत त्यांना सदर घटनेच्या केसच्या सद्यस्थितीबाबत व केसमधील प्रलंबित विषयाबाबत माहिती दिली. तसेच कुळधरण ग्रामपंचायत पोलीस पाटील समीर पाटील यांनी गावातील विविध विकासकामांबाबतचे निवेदन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना दिले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सदर केसमध्ये शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे त्यांना सांगितले.
तसेच याप्रकरणाची सद्यस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडे उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुळधरण ग्रामपंचायत विकासासाठी सहकार्य केले जाईल असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.