महाराष्ट्र ताज्या बातम्या

बदलापूरच्या हरित विकासासाठी कोकण कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार

Kulgaon-Badlapur Municipal Council and Dr Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth officials display the signed Green Badlapur development MoU in Dapoli.

प्रभागनिहाय हरित आराखडा, जैवविविधतेचे संवर्धन आणि शहरी जंगलांच्या निर्मितीवर भर

कुळगाव-बदलापूर नगर परिषद आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यात शहराच्या शाश्वत व पर्यावरणपूरक विकासासाठी सामंजस्य करार झाला आहे. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली दहा वर्षांचा ‘हरित बदलापूर – विकास आराखडा 2035’ तयार केला जाणार आहे.

बदलापूर : कुळगाव-बदलापूर शहराच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी नगर परिषदेने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पुढील दहा वर्षांसाठी ‘हरित बदलापूर – विकास आराखडा 2035’ तयार करण्यात येणार आहे.

हा उपक्रम केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित राहणार नसून शहराच्या सर्वांगीण हरित विकासासाठी शास्त्रीय, तांत्रिक आणि पर्यावरणीय नियोजन करण्यात येणार आहे. तयार होणारा सविस्तर आराखडा राज्य शासनाकडे सादर करून विविध शासकीय योजनांमधून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सामंजस्य कराराअंतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र हरित विकास आराखडा तयार करण्यात येईल. शहरातील विद्यमान वृक्षांची नोंद, त्यांचे संरक्षण आणि शास्त्रीय पद्धतीने संगोपन करण्याबरोबरच स्थानिक व भारतीय वृक्षप्रजातींच्या लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे.

Representatives and officials present during the signing of the MoU for preparing the ten-year ‘Green Badlapur’ development plan. Photo Credit: Kulgaon-Badlapur Municipal Council / Handout

शहरातील जैवविविधतेचा वैज्ञानिक अभ्यास करून तिच्या संवर्धनासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणावर शहरी जंगले, ऑक्सिजन पार्क, जैवविविधता उद्याने आणि हरित पट्टे विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. शहरातील प्रदूषणाचे विश्लेषण करून ते कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाय सुचविण्यात येतील.

हवामान बदलामुळे निर्माण होणारी आव्हाने, शहरातील वाढते तापमान आणि पर्यावरणीय असमतोल लक्षात घेऊन ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे तसेच उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी वैज्ञानिक नियोजन केले जाणार आहे. वृक्षसंवर्धनासह जलसंवर्धन, मृदसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण शिक्षणावरही भर दिला जाईल.

या प्रकल्पासाठी आवश्यक संशोधन, प्रशिक्षण, वृक्षप्रजातींची निवड आणि अन्य तांत्रिक मार्गदर्शन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. नगर परिषदेच्या अर्थसंकल्पातील उपलब्ध निधीबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण, नगरविकास, वन, हवामान बदल, जैवविविधता आणि शाश्वत विकासाशी संबंधित योजनांमधून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शासकीय कृषी विद्यापीठ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने शहराचा व्यापक आणि वैज्ञानिक हरित विकास आराखडा तयार करण्यासाठी केलेल्या देशातील अशा प्रकारच्या पहिल्या काही करारांपैकी हा एक असल्याचा दावा नगर परिषदेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हा उपक्रम अन्य नगर परिषदांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो.

महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम, 1965 अंतर्गत नगर परिषदेला सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संरक्षण, उद्याने, वृक्षसंवर्धन, सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी विविध विद्यापीठे, संशोधन संस्था आणि सरकारी विभागांशी समन्वय साधण्याचे अधिकार आहेत. या कायदेशीर तरतुदींच्या आधारे हा सामंजस्य करार करण्यात आल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले.

‘हरित बदलापूर’ ही केवळ नगर परिषदेची योजना न राहता शहराची लोकचळवळ व्हावी, यासाठी नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, व्यापारी, औद्योगिक आस्थापना आणि पर्यावरणप्रेमींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वैज्ञानिक नियोजन, लोकसहभाग आणि शासन, विद्यापीठ व नगर परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नांतून बदलापूरला अधिक स्वच्छ, हरित, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दरम्यान, या सामंजस्य कराराच्या वेळी नगराध्यक्ष रुचित घोरपडे, विविध विषय समिति सभापति संभाजी शिंदे, शरद तेली, किरण भोईर, रमेश सोळोसे, नगरसेवक राजेंद्र घोरपडे आणि अन्य नगरसेवक उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे आणि नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात