मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)यांच्या सागर(Sagar) बंगल्यावर भाजपची (BJP )महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अबकी बार 400 पारचा नारा दिला आहे. तसेच माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde )यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली. आपल दुःख आहे ते कोणीतरी समजून घेतलंय त्या नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे. अहिल्यानगरचा भाजपचा खासदार झाला पाहिजे. यादृष्टीने बैठक सकारात्मक बैठक झाली असं सांगितलं.
अहिल्यानगर लोकसभेच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या निवसस्थानी बैठक झाली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, (Radhakrishna Vikhe Patil) सुजय विखे पाटील(Sujay Vikhe Patil),भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) अहमदनगरमधील भाजप नेते उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षांपासूनचे विषय होते. या निवडणुकीला सामोरे जायची इच्छा होती. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने, नेतृत्वाने उमेदवारीचा जो निर्णय घेतला, तो मान्य आहे. त्या जागेसाठी इच्छुक होतो. आता अडचणीचं निराकरण झालं आहे, असं राम शिंदे म्हणाले. तसेच नाराज असल्याची चर्चवर बोलताना आमचे पक्षीय पातळीवर वाद मिटले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात. पक्षाने दिलेला आदेश मानून अबकी बार 400 साठी आम्ही तयार आहोत, असं राम शिंदे म्हणाले.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हेटो वापरण्यावर बोलताना ते म्हणाले, माझ्यावर व्हेटो वापरायची गरज नाही. पक्षात आदेश हा शिरसावंद्य असतात. मागील पाच वर्षाच्या काळातील स्पष्ट चर्चा झाली. आजची बैठक यशस्वी झाली. गळाभेट झाली नाही, मात्र हस्तांदोलन झालं, असं राम शिंदे यांनी सांगितलं.