जालना
किर्तनकार आणि जरांगे पाटील यांचे जिवलग मित्र अजय बारस्कर यांनी काल पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे हेकेखोर आहे आणि गुप्त बैठक घेत असल्याचा आरोप त्यांनी जरांगे पाटलांवर केला.
यावर जरांगेंनी आपली भूमिका मांडली. अजय बारस्कर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे. बारस्करने पैसे घेतल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.
मराठा आरक्षणाचे विधेयक मंगळवारी सभागृहात संमत झाले. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेची अंबलबजावणी करण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. त्यामुळे येत्या 24 तारखेपासून राज्यभरात रास्ता रोको केला जाणार आहे. राज्यभरात आणि प्रत्येक गावात 24 तारखेपासून सरकारला निवेदन देण्यासाठी रस्ता रोको केला जाणार आहे. यासाठी बैलगाड्या, वाहने घेऊनही सहभागी होऊ शकता. तसेच पेपर असलेल्या विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी 10:30 ते 1 या वेळेतच रास्ता रोको केला जाणार आहे. नाही तर दिवसभर हा रास्ता रोको केला गेला असता”, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान मराठा आंदोलनावरून मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकर यांची प्रहार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी हा निर्णय घेतला आहे.