ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनसे कोकणात शिंदे सेना – राष्ट्रवादी विरोधात “या” मतदारसंघात उमेदवार देणार!

X : @milindmane70

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात विधानसभा निवडणुकीचे (Assembly election) बिगुल वाजवले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील 15 विधानसभा जागांपैकी सात विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची व्यूहरचना केली आहे. मनसेने (MNS) महाराष्ट्रात 288 पैकी 200 ते 225 जागा स्वबळावर लढण्याची तयारी केल्याची माहिती मनसेचे कोकणचे सरचिटणीस आणि मुखेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर (MNS Vaibhav Khedekar) यांनी दिली. एकंदरीत मनसेचा सुर पाहता कोकणातील पंधरा पैकी सात मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. त्यातील काही मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) (NCP Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार सध्या नेतृत्व करत आहेत. तर भाजपा (BJP) विरोधात उमेदवार न देण्याची रणनीती मनसेने आखल्याचे दिसून येत आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता त्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचे व त्या पद्धतीने व्यूहरचना तयार झाली असल्याचे वैभव खेडेकर यांनी आज जाहीर केले.

कोकणातील रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) व सिंधुदुर्ग (Sindhudurg) या तीन जिल्ह्यात विधानसभेच्या 15 जागा येतात. त्यापैकी सर्वाधिक जागा रायगड जिल्ह्यात आहेत. त्यातील पनवेल – प्रशांत ठाकूर (भाजपा), कर्जत – महेंद्र थोरवे (शिवसेना शिंदे गट), उरण – महेश बालदी (भाजपा पुरस्कृत अपक्ष), पेण – रवीशेठ पाटील (भाजपा), अलिबाग – महेंद्र दळवी (शिवसेना शिंदे गट), श्रीवर्धन – आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), महाड – भरत गोगावले (शिवसेना शिंदे गट) या सात जागांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाड व श्रीवर्धन या दोन ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात, त्यापैकी रत्नागिरी- उदय सामंत -उद्योग मंत्री (शिवसेना शिंदे गट), गुहागर – भास्कर जाधव (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), दापोली – योगेश कदम (शिवसेना शिंदे गट), चिपळूण- शेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), राजापूर – राजन साळवी( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) हे आमदार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. कणकवली- नितेश राणे (भारतीय जनता पार्टी), कुडाळ – वैभव नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), सावंतवाडी – दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री (शिवसेना शिंदे गट).
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण- संगमेश्वर व राजापूर या तीन ठिकाणी, रायगडमध्ये सात विधानसभा मतदारसंघांपैकी महाड व श्रीवर्धन या दोन ठिकाणी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनपैकी दोन विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करणार असल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले.

वैभव खेडेकर, मनसे सरचिटणीस, कोंकण

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे मनसेचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. त्यावेळी बोलताना वैभव खेडेकर यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख प्रमोद गांधी यांच्या नावाची शिफारस मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे केल्याचे सांगितले. प्रमोद गांधी यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघात काम केले असल्याने, सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांची शिफारस विधानसभेसाठी केली आहे.

आगामी विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी राज्याच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये सांगितल्याचे खेडेकर यांनी सांगितले. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे नसतील, त्या ठिकाणी त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असेही खेडेकर यांनी सांगितले. गुहागर येथील कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला प्रमोद गांधी यांच्यासह जिल्हा सचिव संतोष नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदनकर, चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात