महाराष्ट्र

…तर खुर्ची खाली करा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुरु असलेले आंदोलन पोलीसी बळाचा वापर करुन दडपण्याचा प्रयत्न येड्याचे सरकार करत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करुन हवेत गोळाबार केला, या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. मराठा समाजाला जर शिंदे, फडणवीस, पवार यांचे तिघाडी सरकार आरक्षण देऊ शकत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, आम्ही आरक्षण देऊ, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी या घटनेवर राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

तिघाडी सरकारचा समाचार घेत पटोले पुढे म्हणाले की, भाजपा, देवेंद्र फडणवीस व मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळेच मराठा समाज आजही आरक्षणापासून वंचित आहे. काँग्रेस आघाडी सरकारने दिलेले मराठा आरक्षण फडणवीस सरकारला कोर्टात टिकवता आले नाही. पुन्हा फडणवीस सरकारने मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तोही कोर्टात टिकला नाही. मुळात भाजपाला आरक्षण द्यायचेच नाही म्हणून ते चालढकल करत आहेत, असा आरोपही पटोले यांनी केला.

मविआचे सरकार असताना हेच फडणवीस मराठा समाजाला फक्त मीच आरक्षण देऊ शकतो अशी राणा भिमदेवी थाटात घोषणा करत होते. पण दीड वर्ष झाले आरक्षणावर चकार शब्दही काढलेला नाही. फडणवीस व भाजपा खोटारडे आहेत, त्यांनी मराठा, धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली. आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा गुंता वाढवण्यासही फडणवीस व मोदी सरकारच जबाबदार आहे, असाही घणाघाती आरोप पटोले यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ५० टक्क्यांची मर्यादा काढण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल पण केंद्रातील भाजपाचे सरकार त्यासाठी काहीच हालचाल करत नाही.राज्यात सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षातील कोणाचीही मोदींसमोर बोलण्याची हिम्मत नाही.त्यामुळे केवळ समिती,बैठका व चर्चेचे गाजर दाखवून चालढकल केली जात आहे.आजच्या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा दावाही पटोले यांनी केला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात