ताज्या बातम्या महाराष्ट्र

ड्रग्जसाठा प्रकरणातील खऱ्या मास्टरमाईंडचा शोध घ्या – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant

मुंबई 

महाराष्ट्र एक सुसंस्कृत व प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकार (BJP government) करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललीत पाटील हा एक प्यादा असून या प्रकरणातील खऱ्या मास्टरमाईंडचा सरकारने शोध घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

ड्रग माफिया ललीत पाटीलला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे अभिनंदन करुन पटोले म्हणाले की, नाशिकमध्ये ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर सोलापूरातील एमआयडीसीमध्येही (Solapur MIDC) ड्रग्जचा साठा सापडला. महाराष्ट्रात अशा प्रकारे ड्रग्जचे साठे सापडणे हे राज्यासाठी लाजिरवाणी घटना आहे. या ड्रग प्रकरणातील ललीत पाटील (Drug Mafia Lalit Patil) हा पुण्याच्या ससून रुग्णालयात सर्व सोयींचा उपभोग घेत होता हे समोर आले आहे. आता याच ललीत पाटीलला पळवून लावण्यात येईल असे आम्ही आधीच सांगितले होते. आज आमचे म्हणणे खरे ठरले असून ललीत पाटील स्वतःच सांगत आहे की त्याला पळवून लावण्यात आले होते. या सर्व प्रकरणाचा तातडीने छडा लागला पाहिजे आणि या ड्रग्जच्या काळ्या धंद्याला कोणाचा आशिर्वाद आहे ? ललीत पाटीलच्या मागे कोणती शक्ती काम करत आहे? हेही उघड झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली.

भाजपा सरकार तरुणांच्या हाताला काम देत नाही. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, सरकारी नोकरभरती केली जात नाही, खाजगी कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने पदे भरुन तरुणांची थट्टा केली जात आहे. तर दुसरीकडे तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढून त्यांना बरबाद करण्याचे पापही भाजपचे हे सरकार करत आहे. भाजपा सरकारच्या काळातच घोटाळेबाज, गुन्हेगार, दरोडेखोर, खुनी, बलात्कारी तसेच ड्रग्जचा काळा धंदा करण्यांना ‘अच्छे दिन’आले आहेत. हे सरकार जनतेच्या मुळावर उठलेले असून महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या या माफियांचा तसेच त्यांच्या मागच्या शक्तीचाही त्वरीत शोध लागला पाहिजे, अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात