ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईतील सफाई कामगारांना 50% घरे मालकी हक्काने; फडणवीस यांचे मोठे आश्वासन

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis receiving memorandum from Municipal Mazdoor Union representatives regarding housing scheme for sanitation workers in Mumbai

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत मुंबई महानगरपालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियनच्या वतीने २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलनापूर्वीच अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणली आणि तोडगा काढण्यात यश मिळवले.

मुंबई महापालिका क्षेत्रातील ३६ वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले असून सुमारे १२,२०० नवीन घरे उभारण्यात आली आहेत. यापैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना देण्याच्या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना स्थिर निवासाची संधी मिळणार आहे.

या बैठकीस अण्णा बनसोडे, म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, हिंदुराव जाधव, यशवंत देसाई, अरुण नाईक आदी उपस्थित होते.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात